धुळे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात एकूण 18 लाख 19 हजार 135 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण 41 हजार 526 तर 85 वर्षावरील 20 हजार 792 मतदारांचा समावेश असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये 9 लाख 31 हजार 341 पुरुष, 8 लाख 87 हजार 744 महिला तर 50 तृतीयपंथी मतदार असे एकूण 18 लाख 19 हजार 135 मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 41 हजार 526 मतदार आहेत. 20 ते 29 या वयोगटातील एकूण 3 लाख 78 हजार 811 मतदार, 30 ते 39 या वयोगटातील एकूण 3 लाख 94 हजार 464 मतदार, 40 ते 49 या वयोगटातील एकूण 4 लाख 5 हजार 605 मतदार, 50 ते 59 या वयोगटातील एकूण 2 लाख 77 हजार 456 मतदार, 60 ते 69 या वयोगटातील एकूण 1 लाख 82 हजार 679 मतदार, 70 ते 79 या वयोगटातील एकूण 95 हजार 62 मतदार, 80 ते 84 या वयोगटातील एकूण 22 हजार 740 मतदार तर 85 वर्षावरील मतदारांची संख्या 20 हजार 792 इतकी आहे.
त्याचबरोबर एकूण मतदारांमध्ये 11 हजार 508 दिव्यांग मतदार, तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 50 इतकी आहे. तसेच सेवा दलातील (सर्व्हिस व्होटर्स) 2 हजार 490 मतदार आहेत.
धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदार संघात 3 लाख 63 हजार 455, धुळे ग्रामीण मतदार संघात 4 लाख 7 हजार 113, धुळे शहर मतदार संघात 3 लाख 60 हजार 895, शिंदखेडा मतदार संघात 3 लाख 39 हजार 486 तर शिरपूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 48 हजार 186 मतदारांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी धुळे जिल्ह्यात एकूण 1 हजार 753 मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात 478 तर ग्रामीण भागात 1 हजार 275 केंद्र असणार आहेत, अशी माहितीही उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.