नंदुरबारच्या वैष्णवी चौधरी ची साता समुद्रपार भरारी..

नंदुरबार – महाराष्ट्राचे तेली महासंघ प्रदेशाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री विजय भाऊ चौधरी यांची कन्या कु. वैष्णवी हिने आज अमेरिकेतील बोस्टन येथील नॉर्थईस्टन युनिव्हर्सिटीतून एम. एस. ही उच्च शिक्षणाची डिग्री संपादित केली. त्याबद्दल कु.वैष्णवीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.नंदुरबार या आदिवासी दुर्गम जिल्ह्यातील एक कन्या थेट अमेरिकेत शिक्षण घेऊन उंच भरारी घेते; याबद्दल स्थानिक नागरिकांमधून व तेली समाजातील मान्यवरांकडून विशेष अभिमान व्यक्त केला जात आहे. कोरोनाचे भयंकर थैमान चालू असतानाच्या काळात घरातून कोणीही बाहेर पडण्यासाठी धजावत नव्हते. अशा बिकट काळात कु.वैष्णवीने कोरोनाचे आव्हान पेलून उच्च शिक्षणासाठी (M.S.) थेट अमेरिकेतील बोस्टन गाठले. विविध विषयात उत्तम गुण संपादित करीत कु.वैष्णवी हिने एम.एस या पदाची उंच डिग्री संपादित केली. बोस्टन हे अमेरिकेतील विद्येचे माहेरघर मानले जाते. या शहरातील नॉर्थईस्टन युनिव्हर्सिटी विद्यापीठाचे कुलसचिव डेविड फिल्डस यांच्या उपस्थितीत एका शानदार सभागृहात पदवीदान समारंभ नुकताच संपन्न झाला. आपल्या आयुष्यातील स्वप्न साकार झाल्याचा आनंद व्यक्त केला. कु. वैष्णवीने डिग्री स्वीकारली तेव्हा तिने तिने भारतीय नारीचा पेहराव अर्थात साडी परिधान केली होती. एका हातात डिग्री तर दुसर्या हातात भारताचा तिरंगा वैष्णवीच्या हातात होता. डिग्री प्राप्त होताच वैष्णवीने सगळ्यांना नमस्कार करून अभिनंदन केले. त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. या पदवीदान समारंभानंतर आपली प्रतिक्रिया नोंदवताना वैष्णवी चौधरी म्हणाली की, “मला प्राप्त झालेल्या या उच्च शिक्षणाच्या डिग्रीचे श्रेय मी माझ्या आई-वडिलांना देते.” “कुमारी वैष्णवी ही अतिशय हुशार असून तिचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहे. अभ्यास, योगा, क्रीडा, स्वयंपाक सर्व क्षेत्रात ती अग्रेसर असून आई वडील म्हणून आम्हाला दोघांनाही तिचा सार्थ अभिमान आहे. स्वतःच्या मेहनतीने बुद्धीने, कल्पकतेने वैष्णवीने हे यश संपादित केले, अशी भावना तिचे वडील विजयभाऊ चौधरी यांनी व्यक्त केली. वैष्णवीने एम एस डिग्री प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares