जळगावमध्ये वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट : तिघांचा मृत्यू , दहा जण गंभीर जखमी

जळगावात कारमध्ये बेकायदेशीरपणे घरघुती गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला होता. या घटनेमध्ये १० जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यातील दानिश शेख, भरत सोमनाथ दालवाले व संदीप सोपान या तिघांचा उपचार सुरु असताना निधन झाले.

घरगुती वापराचे गॅस सिलिंडरची किंमत कमी असल्यामुळे वाहनांमध्ये हा गॅस भरण्याचा प्रकार अनेक ठिकाणी होत असतो. या गॅसचा वापर व्यावसायिक किंवा वाहनांसाठी करता येत नाही. त्यानंतरही काही वाहनांमध्ये गॅस भरला जातो. नुकतीच जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात घरगुती गॅसचा वापर खासगी वाहनात भरत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट होवून दहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यापैकी तिघांचा उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला तर उर्वरित सात जखमींवर पुणे तसेच जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
रिफिलिंग सेंटर चालक दानिश शेख, भरत सोमनाथ दालवाले व वाहन चालक संदीप सोपान यांनी या घटनेत आपला जीव गमावला. अनेक ठिकाणी अवैधपणे खाजगी वाहनांमध्ये गॅस भरण्याची केंद्र सुरू आहेत परंतु त्यांच्यावर पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जीव गमवावा लागत आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर तरी पोलीस संबंधितांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares