“ना कोई टक्कर मे, है ना कोई चक्कर मे है.” असे स्मृती इरानींचे विधान
“भाजपाला न चुकता मतदान करा” असे आवाहन
शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप व महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ 12 नोव्हेंबर रोजी माजी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांची शिरपूर येथे जाहीर सभा झाली. यावेळी भारत माता की जय… जय श्रीराम… चा जयघोष मोठ्या प्रमाणात करण्यात आला.
स्मृति इराणी यांनी विरोधकांवर टीका न करता विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत त्या म्हणाल्या, ” अमरीशभाईंचे काम मोठे असून आपल्या संस्थेतून असंख्य विद्यार्थी घडविल्याची बाब आनंददायी आहे. आपल्याकडे लवकरच एम.आय.डी.सी. होऊन विकासात भर पडावी अशा शुभेच्छा देते शिरपुरात 1 हजार बेडचे हॉस्पिटल होत असून यामुळे हजारो गरजू रुग्णांची सोय होईल. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा तालुक्यात हजारो लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिल्याचा आनंद आहे. तसेच आ.अमरिशभाई पटेल व आ. काशिराम पावरा यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे देशाच्या सुवर्ण इतिहासात शिरपूरचे पान देखील जोडले जाईल. दोन्ही आमदारांच्या परिश्रमामुळे शिरपूर तालुक्याचा कायापालट झाल्याचे अतिशय समाधानकारक चित्र दिसून येते. प्रत्येक क्षेत्राला सरकार कडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे, नवतरुण वर्गाला दिशा देणारे भाजपा सरकार मनापासून काम करत आहे”
तसेच पंतप्रधान मोदींची प्रशंसा करीत त्या म्हणाल्या,”देशाच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी देशाला नवी दिशा दिली असून जगातील विकसित देश म्हणून सन्मान प्राप्त करुन दिला आहे. पंतप्रधान मोदीजी यांनी संसदेत प्रवेश करतांना डोके टेकले, ही आपली महान संस्कृती आहे. सर्वांना सन्मान देण्याचे कार्य मोदीजी यांनी केले आहे.”
यावेळी आमदार अमरिशभाई पटेल हे जनतेला आवाहन करत म्हणाले,” शिरपूर तालुक्याचा विकास हेच आमचे व्हिजन आहे. सर्वसामान्य नागरिकांचा विकास व्हावा यासाठी आपण गेल्या 35 वर्षांपासून मनापासून काम करत आहोत. आ. काशिराम पावरा हे प्रामाणिक व निष्कलंक असून अशा नेत्याचे जतन करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे”
आमदार काशिराम पावरा यांनी सभेचे निदर्शन करत सांगितले,”शिरपूर तालुका सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर राहण्यासाठी आतापर्यंत आम्ही शासनाच्या अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या. आणि गेल्या 15 वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केले असून यापुढे दुप्पट कामे करणार आहोत.”
या जाहीर सभेला अमरिशभाई पटेल, दीपक देसाई ,बबनराव चौधरी ,किशोर माळी ,भूपेश पटेल, चिंतन पटेल , तुषार रंधे , देवेंद्र पाटील, बाळकृष्ण पाटील, जयश्री पटेल यांसोबत विविध संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, पुरुष, युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.