चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमधील हवालदार जयेश पवार यांनी मौजे तरवाडे येथील रहिवासी असलेल्या एका तक्रारदाराकडून तडजोडीअंती ४,००० रुपयांची लाच मागितली होती. त्यात पहिल्या हप्त्याच्या २,००० रुपयांची रक्कम खाजगी इसम सुनिल श्रावण पवार यांच्या हस्ते स्वीकारताना त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आलें.
तक्रारदाराचा गावातील एका व्यक्तीसोबत झालेल्या वादानंतर त्यांच्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, वाघळी बिटचे हवालदार जयेश पवार यांनी तक्रारदारास पोलीस स्टेशनमध्ये बोलावून प्रतिबंधक कारवाईसाठी तहसीलदारांच्या समक्ष नेले. तक्रारदाराने घरी जाण्याची विनंती केली असता, हवालदार पवार यांनी त्यांच्या विरोधातील कारवाईत मदत करण्याच्या मोबदल्यात ४,००० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यात पहिल्या हप्त्याच्या २,००० रुपयांची रक्कम खाजगी इसम सुनिल श्रावण पवार यांच्या हस्ते स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले .
या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी आणि त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिनिधी कार्तिक सोनावणे
झेप मराठी धुळे