हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या वॉर्डला भीषण आग ; 10 लहान मुलांचा मृत्यू , 16 मुलं जखमी

झांसीमध्ये घडली मनाला हादरवून टाकणारी घटना
हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या वॉर्डला भीषण आग
10 लहान मुलांचा मृत्यू , 16 मुलं जखमी

उत्तर प्रदेशच्या झांसीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी भीषण आग लागली. हि आग लहान मुलांच्या वॉर्डमध्ये (NICU) लागली असता या दुर्घटनेत 10 मुलांचा मृत्यू झाला तर 16 जखमी झाले आहेत.

महाराणी लक्ष्मीबाई मेडीकल कॉलेजमध्ये रात्री 10.45 च्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्तळी पोहोचले व बचावकार्य सुरु झाले. चिंताजनक प्रकृती असलेल्या बालकांना NICU मध्ये ठेवलं जातं. याच NICU ला आग लागल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
37 नवजात बाळांना खिडकी तोडून वाचवण्यात आले. तर आगीत होरपळून 10 मुलांचा मृत्यू झाला आहे व 16 जखमी झाले आहे. झांसीचे वरिष्ठ पुलिस अधिक्षक (एसएसपी) सुधा सिंह यांनी सांगितलं की, “घटनेच्यावेळी NICU मध्ये 50 पेक्षा जास्ता मुलं होती तर 16 मुलांवर उपचार सुरु आहेत.”

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशावरुन उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक झांसी येथे पोहोचले आहेत. पाठक यांनी सांगितलं की, “फेब्रुवारी महिन्यात फायर सेफ्टी ऑडिट झालं होतं. जून महिन्यात मॉक ड्रील सुद्धा झालेलं. ही घटना का आणि कशी झाली, या बद्दल चौकशी अहवाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल”
7 नवजात शिशूंच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे. 3 मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाही. मृत मुलांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची तर जखमी मुलांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त करत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना चांगले उपचार कसे मिळतील, ते सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares