धुळ्यातील राजेंद्र बंब या अवैध सावकाराचे प्रकरण राज्यभर गाजत असून रोज वेगवेगळी माहिती, दस्तऐवज आणि करोडोची रक्कम हाती लागत आहे. आर्थिक गुन्हे शाखेने आज मंगळवारी धुळ्यातील योगेश्वर नागरी पतपेढीवर छापा टाकला. या ठिकाणच्या 7 लोकर्स ची तपासणी केली . यातून 2 कोटी 47 लाखाची रोकड, 210 सौदा पावत्या, 100 कोरे चेक, विदेशी चलन जप्त केले. इतकेच नाही तर 6 लाख रुपये किमतीचे 34 सोन्याचे नाणे आणि 2 कोटी रुपयान पेक्षा अधिक किमतीच्या तब्बल 2400 फिक्स डिपॉझिट देखील आढळून आल्या आहेत.यातील मुख्य आरोपी राजेंद्र बंब यास न्यायालयाने 5 दिवस पोलिस कोठडी वाढवून दिली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 10 कोटी पेक्षा जास्त रोख रक्कम आणि 6 कोटींपेक्षा जास्त रकमेचे दागिने जप्त केले आहेत.
