धुळे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाकरीता नियुक्त, केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांनी आज दिनांक 19 नोव्हेंबर, 2024 रोजी साक्री तालुक्यातील सावरीमाल व डोंगरपाडा या मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील पाहणी केली.
धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी होत आहे. धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाकरीता , केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक रामा नाथन आर यांना नियुक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर निरीक्षक श्री. रामा नाथन आर यांनी साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात फिरते सर्वेक्षण पथकाने (FST) भेट देऊन पाहणी केली व तेथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच मतदान केंद्रांवर मतदानाच्या आदल्या दिवशी व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी करावयाच्या कार्यवाहीबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार कार्यवाही करुन दक्ष राहण्याच्या सुचना सर्व पथकांना दिल्या. तसेच फिरते सर्वेक्षण पथकास (FST) आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करुन तपासणी करण्याचे व अधिक दक्ष राहण्याचे निर्देश दिले.
यावेळी त्यांच्यासोबत फिरते सर्वेक्षण पथकाचे (FST) हेमंत अकलाडे, कार्यकारी अभियंता मुकेश ठाकुर आदी उपस्थित होते .