धुळे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी काल २० नोव्हेंबर रोजी पार पडल्या असून धुळे जिल्ह्यात पाचही मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५९.७५ टक्के मतदान झाले. काही मतदान केंद्रात रात्री उशिरापर्यंत मतदान होत असल्याने हि सरासरी वाढून ६९ टक्क्यांपर्यंत मतदान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळपासूनच केंद्रांवर पुरुषांप्रमाणेच महिलांचीही गर्दी दिसून आली. किंबहुना काही भागात लाडक्या बहिणीची संख्या पुरुषांपेक्षा अधिक जाणवली.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत धुळे शहरात ५१.६४ टक्के , धुळे ग्रामीणमध्ये ६३.०१ टक्के , साक्री तालूक्यात ६१.६१ टक्के , शिरपूर तालुक्यात ६१.७४ टक्के तर शिंदखेडा तालुक्यात ६०.४४ टक्के मतदान झाले.
आता निकालाची आतुरता वातावरणात आहे. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी हि २३ नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरु होणार आहे.
साक्री विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी, शासकीय धान्य गोदाम, शेवाळी फाटा, साक्री येथे होणार असून धुळे ग्रामीणची मतमोजणी शासकीय तांत्रिक विद्यालय, जेलरोड, धुळे येथे होणार आहे. धुळे शहरची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम, नगाव बारी, धुळे येथे होणार आहे. शिंदखेडा तालुक्याची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम क्रमांक १, कुमरेज रोड, शिंदखेडा येथे होणार असून शिरपूर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी मुकेशभाई टाऊन हॉल, करवंद नाका, शिरपुर येथे होणार आहे.