राज्यभरात भाजपने मिळवलेल्या भरभरून यशावर शंका उपस्थित केल्या जात आहेत. सत्तेचा गैरवापर करत भाजपने ईव्हीएम प्रणालीत घाेळ केल्यामुळेच शिरपूर मतदारसंघात त्यांना हे यश मिळाल्याचा आराेप उमेवार गितांजली कोळी यांनी केला आहे.
साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत गितांजली कोळी यांनी सांगितले की, गावातून तुम्हाला मतदान कसे पडले नाही म्हणून अनेक फोन आले.जास्तीत जास्त पन्नास हजार व कमीत कमी तीस हजार मते पडण्याची होती.शिरपूर येथील सहा उमेदवार पैकी सर्वात जास्त मी गावोगावी फिरली असतांना न फिरणारे उमेदवार यांना ५००० मते आहेत.साठ सत्तर गावांमध्ये प्रचार केला. मतांमध्ये घोळ आहे हे आदीवासी टोकरे कोळी जमातीला धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी फार मोठे षडयंत्र आहे. शिरपूर 09राखीव विधानसभा मतदारसंघ येथे मशीन मध्ये केलेल्या घोटाळ्यात संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे असे देखील त्यांनी सांगितले. आदिवासी समाज मोठा आहे. आमदार पावरा यांची लोकप्रियता घसरतचालली आहे. मात्र हे निवडून आले हे मात्र मान्य नाही. शिरपूरात शेतकरी देखील मोठ्या संकटात आहे. मतदाराचा विश्वास घाट झाला आहे. आज देखील अनेक महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नाराजी देखील होती. असा आरोप देखील गितांजली कोळी यांनी केला. या पत्रकार परिषदेला रवींद्र कोळी, गिरधर महाले,हेमराज कोळी आदी उपस्थित होते.