विधानसभा निकालानंतर मेहकरमध्ये दंगल ; 23 आरोपींना अटक, तणावपूर्ण शांतता

विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर मेहकर शहरात रविवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री दंगल उसळली . दोन गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक करीत ५ वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली. त्यामुळे रविवारी रात्रीपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली असून कलम 144 लागू केले आहे. आता शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात तणावर निर्माण झाला. २४ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास , जानेफळ रोड येथील एका हॉटेलमध्ये जेवणानंतर दोन जणांच्या वादाने आक्रमक रूप घेतले. या वादाचे दंगलीत रूपांतर झाले. दोगही गटांनी एकमेकांवर तुफान दगफेक केली. ५ वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली. पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. त्यानंतर पोलिसांनी या भागांत बंदोबस्त वाढवून संचारबंदी लागू केली. मेहकर शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आणि कलम 144 लागू केले गेले.
या घटनेत पोलिसांनी २० दंगलखोरांना अटक केली असून ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आल्याने सोमवारी सायंकाळी ५ वाजता संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.

मेहकरमध्ये जाळपोळ झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे शहरात तणाव अजून वाढला आहे. पोलिसांनी आता सोशल मीडियावर लक्ष ठेवले आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares