धुळ्यात अचानक वातावरणात गारवा वाढलाय. थंडीने हुडहुडी भरतेय. तापमान साधारणतः १० डिग्री सेल्सिअस घसरले असून हे तापमान ८ ते ९ डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मागच्या वर्षीही धुळ्यातले तापमान ७ डिग्री सेल्सिअसच्या खाली गेले होते. हवेमध्ये प्रचंड गारवा निर्माण झाला असल्याने थंडीचा जोर आणखीच वाढलाय. वाढत्या थंडीमुळे रात्री लवकर शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसू लागले आहेत. ह्या घसरलेल्या तापमानामध्ये थोडी ऊब मिळावी म्हणून नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत.
या वाढलेल्या थंडीमुळे वर्षभरापासून कपाटात ठेवलेले स्वेटर,कानटोपी,मफलर आता बाहेर काढण्यात येत आहे. तसेच थंडीपासून संरक्षणाच्या गरम कपड्यांची मागणी वाढली असल्याने नेहमीप्रमाणेच यावर्षीहि तिबेटियन स्वेटर विक्रेत्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. लोकांची मोठी गर्दी तिबेटियन मार्केटला दिसली. त्यांच्याकदे उपलब्ध काश्मिरी पद्धतीच्या स्वेटरचा ट्रेंड चालू असल्याने काश्मिरी पद्धतीचे स्वेटर्स आणि शाल हे लोकप्रिय होत आहे.
तसेच नवीन पिढीला आवडणारे , परदेशी फील असलेले , लॉन्ग स्वेटर कोट आणि जम्परहि या मार्केट ला विक्रीसाठी आहे. त्यामुळे तरुणांचीही गर्दी याठिकाणी दिसून आली.
वेगवेगळ्या प्रकारचे आणि पद्धतीचे स्वेटर , कोट , शाल , टोपी , मोजे असे थंडीपासून वाचण्याचे गरम कपडे याठिकाणी उपलब्ध आहे.
