महसूल विभागाने काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास,निमडाळे – वार रस्त्यावर गौण खनिजांची चोरटी वाहतूक करणाऱ्या ८ डंपर वाहनांना ताब्यात घेतले. नॅशनल हायवेचे काम करणाऱ्या जे.एम.म्हात्रे ग्रुपची ही वाहने असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणूक संपताच प्रशासनाने अवैध गौण खनिजांचे वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या सूचनेनुसार गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु झालीय. ग्रामीण तहसील कार्यालयाच्या पथकाने निमडाळे – वार रस्तावर गौण खनिज मुरुमची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई केली. कारवाईत ८ डंपरमध्ये गौण खनिज आढळून आले. ही वाहने जे.एम.म्हात्रे ग्रुपची असल्याचे सांगण्यात आले. म्हात्रे ग्रुपने गौण खनिजांसाठी परवानगी घेतली असल्याचे सांगितले. तसेच परमिट ही दाखवले. पण ऑनलाईन प्रक्रिया केली नसल्याचे आढळले . त्यामुळे डंपर जमा करून ते तहसील कार्यालयात आणले. कागदपत्रांची मागणी करून तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
ही कारवाई नायब तहसीलदार संजय पवार, मंडळ अधिकारी कविता हाके, डी.टी.महाजन, सी.वाय.पाटील, सोनगीर तलाठी विजय बाविस्कर , कुंडाणे वारचे तलाठी पांडुरंग ढाके , कोतवाल उमेश नाईक , सुनील बोरसे , केतन सूर्यवंशी , चालक भिकन सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.