विधानसभेत निवडून आलेल्या १८७ आमदारांवर विविध गुन्ह्यांची नोंद

नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या. निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी तब्बल १८७ म्हणजेच ६५ टक्के आमदारांवर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये देखील ११८ आमदारांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न करणे, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचारासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् (एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचच्या ताज्या अहवालानुसार आमदारांनी निवडणुकीत भरलेल्या प्रतिज्ञापत्रातील तपशीलानुसार हे गुन्हे उघडकीस आले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला भरभरून यश मिळाले आहे. भाजपचे १३२ उमेदवार निवडून आले आहेत. या १३२ पैकी ९२ आमदारांवर अनेक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातही ५२ आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ५७ उमेदवार निवडून आलेत. त्यापैकी ३८ आमदारांवर गुन्हे दाखल असून २६ आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडून आलेल्या ४१ आमदारांपैकी २० आमदारांवर तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या २० आमदारांपैकी १३ आमदारांवर तर काँग्रेसच्या ९ आणि शरद पवारांच्या पक्षातील ५ आमदारांवर गुन्ह्यांची नोंद आहे.

यासोबतच अजित पवार गटाचे १०० टक्के आमदार करोडपती असून भाजप आणि शिवसेनेचे ९८ टक्के आमदार करोडपती असल्याची बाब समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares