जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे दोन दुचाकीस्वरांच्या झालेल्या अपघातात एकाने जीव गमावला. दुसऱ्या दुचाकीस्वारांवर घुंह नोंदविण्यात येत असताना २ पोलीस हवालदारांनी त्यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून एका पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले असून दुसरे फरार झालेत.
तक्रारदार हे दि. 7 नोव्हेंबर रोजी मोटार सायकल ने पारोळा ते धरणगाव रस्त्यावर जात असतांना त्यांच्या मोटारसायकल ची समोरून येणाऱ्या मोटरसायकल शी धडक झाली. त्यामध्ये समोरील मोटोरसायकल वरील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने तक्रारदार यांचेविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करणेकरीता पारोळा
पोलीस स्टेशनमधील हवालदार हिरालाल देविदास पाटील व प्रवीण विश्वास पाटील यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने ह्या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली असता पंचासमक्ष झालेल्या पळताळणीत हिरालाल पाटीलयांनी तक्रारदारांकडे 30,000 रुपये लाचेची मागणी केली असून तडजोडीअंती १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे समोर आले.
हिरालाल पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवरून प्रवीण पाटील यांना फोन करून तक्रारदार यांच्याशी बोलणे करण्यास दिले असता प्रवीण पाटील यांनी तक्रारदार यांना हिरालाल पाटील यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले. त्याप्रमाणे हिरालाल पाटील यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून प्रवीण पाटील फरार झाले आहेत. त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई ,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे करत आहेत.