संशयित विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश

धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती गंगाराम पवार यांना गुरुवारी 5 डिसेंबर रोजी गुप्त माहिती मिळाली की, मार्केट परिसरात एक व्यक्ती विना नंबर प्लेट असलेल्या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरत आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक पवार यांनी शोध पथकाला तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

गुरुवारी पाच डिसेंबर रोजी दुपारी सुमारे दोन वाजता मार्केट परिसरातील एका दर्ग्याजवळ संशयित व्यक्ती काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलवर दिसून आला. पोलीस पथकाने त्याला थांबवून विचारपूस केली असता, त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आझाद नगर पोलिसांना अधिक
संशयाला आणि त्यांनी त्याला विश्वासात घेत चौकशी केली.

चौकशीत त्याने ही मोटारसायकल चंदननगर, देवपूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिली. तसेच, त्याने आपल्या इतर साथीदारांसह आणखी धुळे शहरासह बाहेरील जिल्ह्यातून मोटारसायकल चोरी केल्याचे मान्य केले.

या कारवाईदरम्यान, आझाद नगर पोलिसांनी संशयिताकडून एकूण ७ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, संबंधित संशयित हा विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, समाधान सुरवाडे त्यांचे पथकातील पोहेकॉ योगेश शिरसाठ, संदीप कढरे, गौतम सपकाळे, शांतीलाल सोनवणे, रफिक पठाण, योगेश शिंदे, मक्सुद पठाण, पंकज जोंधळे यांनी सदरची कारवाई केली आहे,

प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, धुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares