भुसावळ विभागाला ४५ हजार फुकट्या प्रवाशांकडून १३८ कोटींचे उत्पन्न
मध्य रेल्वेतील भुसावळ विभागाला नोव्हेंबर महिन्यात ६५ हजार फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ४ कोटी १८ लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय.
नोव्हेंबर महिन्यात उत्कृष्ट कामगिरी
भुसावळ विभागाने वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये नोव्हेंबर मध्ये महसुलाचे विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ साधून चांगली कामगिरी केली आहे. या वित्तीय वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात प्रवासी उत्पन्न 63 कोटी 44 लाख रुपये, अन्य कोचिंगमधून आठ कोटी आठ लाख रुपये, माल परिवहन करण्यातून 65 कोटी 21 लाख रुपये, विविध विभागातील उत्पन्नातून एक कोटी 73 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. नोव्हेंबर महिन्यात मलकापूर आणि शेगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट सुरू करण्यात आली. दिव्यांगजन आणि वृद्ध प्रवाशांना प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्यास अधिक सोय निर्माण झाली आहे. सामान्य प्रवाशांनाही ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. तिकीट तपासणी पथकाकडून यात ४ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.