अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था महिला अघाडी अध्यक्ष प्रा.सौ सुषमाताई सावळे यांच्या कार्यकाळात न भुतो न भविष्यती असा महिला दिनदर्शिका प्रकाशन सोहळा महिला मेळावा तसेच नवदुर्गा पर्व ३रे हा दिमाखदार सोहळा दि.२४/११/२०२४ रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले अ.भा.राष्ट्रिय अध्यक्ष माननिय श्री वनेशजी खैरनार कार्याध्यक्ष मा.श्री मुकुंदनाना मांडगे तसेच विश्वस्त मा.श्री डी.व्ही.दादा बिरारी, मा.श्री नरेंद्रबापु भामरे ,मा.श्री दिलीपअण्णा भांडारकर, मा.श्री पी.टी.अण्णा शिंपी, मा.श्री रविंद्र बाबा बागुल तसेच मा.श्री मनिलालजी शिंपी व मा.श्री बंडुनाना शिंपी उपस्थित होते. अ.भा.महिला मार्गदर्शक श्रीमती सुमनताई ब्राम्हणकर,श्रीमती अरुणाताई कापडणेकर,सौ हर्षदाताइ बोरसे ह्या उपस्थित होत्या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन संपन्न झाले तसेच मान्यवरांनी अखिल भारतीय महिला आघाडीअध्यक्ष प्रा.सौ सुषमाताई सावळे यांच्या मागणी विचार करत की महिला आघाडी साठी वेगळा फंड असावा ही मान्य केली व ग्वाही दिली, आपल्या महिला अध्यक्षा प्रा.सौ सुषमाताई सावळे ह्यांनी आपल्या अखिल भारतीय संस्थेतेचे जनक तसेच प्रथम अ.भा.अध्यक्ष कै.दादा सुरते ह्यांची प्रतिमा पुजन करुन ही अ.भा.प्रशासकीय कार्यालयास दादांची प्रतिमा भेट देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.श्री जितेंद्रजी मेटकर समाजाचे कुशल वक्ते आपल्या समाजाची बुलंद तोफ ज्यांच्या एक एक शब्द नविन उर्मी संचारावी त्यांच्या मंत्रमुग्ध वाकशैलीने उपस्थितांना नवविचार आत्मसात करण्यास प्रेरीत केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा प्रथमच महिलांनी महिलांचा समावेश असलेली दिनदर्शिका प्रकाशित केली . तसेच नवदुर्गा पर्व ३रे हा सोहळा ह्या सोहळ्याच्या नवदुर्गा
१) श्रीमती. अरुणाताई प्रल्हाद कापडणेकर (धुळे)२) सौ. संगीता किशोर खैरनार (नवसारी)३) सौ. मोहिनी दिलीप कापडणे (चाळीसगाव)४) सौ. मनिषा जगताप (सावळे) (जळगाव)५) श्रीमती मंगला अशोक पवार (कल्याण)६) श्रीमती.मीना बोरकर (औरंगाबाद)७) सौ. गायत्री श्याम सोनवणे (नाशिक)८) सौ शशिकला ताई निकुंभ (सेंधवा)९) सौ हर्षदाताई हेमंत बोरसे (मुंबई) ह्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.