आरोपी ताब्यात , मुद्देमाल हस्तगत..
धुळे जिल्ह्यातील प्रभातनगर भागात धाडसी चोरीची घटना उघडकीस आलीय . बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी घरात प्रवेश करून एक लाख वीस हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने तसेच पितळेची भांडी लंपास केलीत. चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देवपूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रभात नगर भागात राहणारे राम मनोज निकम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटे घरात शिरले. कपाटातील आणि घरातील एक लाख वीस हजार किमतीच्या सोन्या चांदीचे दागिने तसेच पितळेचे भांडी चोरटयांनी चोरून नेल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलीस अधिकारी आणि तपस पथकाचे कर्मचारी यांनी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणीत दोन तरुण आणि त्यांच्या सोबत असलेला एक कुत्रा हे घराजवळ उभे होते. त्यातील एका तरुणाने तोंडाला काळ्या आणि पांढऱ्या रंगाची मफलर गुंढाळलेले होती. यावरून परिसरात कुत्रा पाळणारा आरोपीचा तपास केला असता तपास दरम्यान परिसरात कुत्रा पाळणारा आरोपी हर्षल उर्फ सनी चौधरी हा वीटभट्टीत राहत असून हर्षल हा रेकार्डवरील गुन्हेगार आहे. आरोपीस ताब्यात घेतले असता आरोपीताकडे काळ्या आणि पांढऱ्या रंगाची मफलर मिळाली . आरोपीची विचारपूस केली असता हर्षल आणि त्याचा मित्र जयवंत बापू पाटील यांनी मिळून चोरी केल्याचे कबुल केले आहे . आरोपीना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
प्रतिनिधी – कार्तिक सोनावणे