मुंबईःशिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. शिंदेंना भाजप, शिवसेनेचे बंडखोर आमदार, अपक्ष आमदार व छोटे पक्ष यांचा पाठिंबा आहे. ते एकटेच आज सायंकाळी ७:३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजप सत्तेत राहणार असले, तरी या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे सहभागी होणार नाहीत,असे त्यांनी सांगितले
