साताऱ्यात चक्क न्यायाधीश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी पाच लाखांची मागणी, न्यायाधीशाला अटक ..
सातारा : अत्याचारविरुद्ध न्याय मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय. मात्र चक्क न्यायाधीशच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये न्यायाधीशला लाच घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले. न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटीकरप्शनच्या पोलिसांनी पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले,. न्यायाधीशच लाच घेताना आढळून आल्याने कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. न्यायपालिकेतील वरिष्ठ अधिकारीच लाच प्रकरणात अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares