कुसुंबा गावात मंगळवारी मध्यरात्री स्वामी समर्थ कॉलनी परिसरात चोरांनी घरफोडी करून घरातून सोन्याचा लाखोंचा ऐवज लंपास झाला. या घटनेने गावात खडबड उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . याकरिता कुसुंबा गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
मंगळवारी मध्यरात्री श्री शांतीलाल झिपरू परदेशी यांच्या घरातून सोन्याचा लाखोंचा ऐवज लंपास झाला होता. या चोरीने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण झाले आहे. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असते तर कदाचित चोर सापडले असते असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. कुसुंबा ग्रामस्थांनी जि प सदस्य संग्राम पाटील पं. स. सदस्य रितेश परदेशी, डॉ. लेखराज शिंदे यांच्याकडे गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी गावकऱ्यांनी मागणी केली होती. गावकऱ्यांची गरज लक्षात घेता संग्राम पाटील, रितेश परदेशी, व डॉ. लेखराज शिंदे यांनी तात्काळ परिवर्तन पॅनलची बैठक बोलावली. बैठकीत आपल्या कुसुंबा गावात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे असल्याचे सांगितल्याने परिवर्तन पॅनलचे सर्व सदस्ययांनी सकारात्मकता दर्शवली. लोकसभागातून गावात एकूण 30 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कामाची पाहणी करण्यासाठी धुळे तालुका पोलीस निरीक्षक श्री अभिषेक पाटील यांनी कुसुंबा गावाला भेट देऊन परिवर्तन पॅनलचे कौतुक केले आहे.