राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 84 वा वाढदिसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची संसदेत भेट घेतली. आता मंत्रिमंडळाचा नेमका विस्तार कधी होणार? याबाबत अजित पवारांनी भाष्य केल.
अजित पवारांनी उसाच्या प्रश्नावर अमित शाह यांच्याशी चर्चा केली. उसाचा भाव वाढवण्यासाठी पवारांनी विनंती केली होती. यावर अमित शाह यांनी जानेवारीपर्यंत या विषयावर निर्णय घेऊ असे सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला होणार असल्याचे, अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला पार पडणार का? राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.