‘प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्काराने प्रा. डॉ. घनश्याम थोरात सन्मानित

आंबेडकर राइट्स अँड इट्स फंडामेटंल कॉन्सेप्ट” या शोध प्रबंधाचे लेखक, समकालीन साहित्यसौंदर्याचे मीमांसक, गेली काही वर्षे प्रबोधनातून राष्ट्रनिष्ठा , ट्रॅफिक सेन्स, राष्ट्रीय एकात्मता या विषयावर निंरतर कार्य करणारे प्रा डॉ पंडित घनश्याम पुंडलिक थोरात यांना ५३ व्या थानपीर युद्ध सन्मान दिनानिमित्त “१३ महार रजिमेंट चे मेजर जनरल बिनोय कुंडन यांच्या हस्ते ” प्राइड ऑफ इंडिया “हा अद्वितीय सन्मान देवून इंडीयन आर्मी च्या वतीने विशेष गौरव करण्यात आला आहे विशेष म्हणजे १३ महार रेजिमेंट बटालियनचे सुबेदार रोहिदास बैसाणे,मेजर देवानंद आखाडे,कप्तान सुधीर आहिरे,सुबेदार रामचंद्र जाधव,कॅप्टन सदाशिव भिंगारदिवे, सुभेदार रविकांत खंडारे, प्रसिद्ध सराफ अभय नाशिककर आदी मान्यवर सुभेदार , सेंट्रल इंडीयन मिलट्री ऑफिसर्स यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. प्रा डॉ घनश्याम थोरात हे “प्राइड ऑफ इंडिया” या सन्मानाचे देशातील पहिले ” प्रबोधनकार गायक ” ठरले आहेत.”जीवन समृद्ध निर्मिणाऱ्या सांस्कृतीक पर्यावरणासाठी सतत झटणाऱ्या कलावंत विचारकाचा हा सन्मान असल्याचे महार रेजिमेंट बटालियन चे मेजर भिमराव बोरसे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0Shares