शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील निष्काम सेवेचे व्रत घेतलेल्या होमगार्ड संघटना स्थापनेला ७८ वर्ष पूर्ण झाल्याने होमगार्ड पथकाने ७ डिसेंबर ते १३ डिसेंबर, सात दिवस स्वच्छता अभियान राबवून सप्ताह उत्साहात साजरा केला.
मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम ‘नगरसेना ‘(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांची संघटना स्थापन केली. सण,उत्सव,निवडणुका, मोर्चा,आंदोलन,संप,परीक्षा आदी काळात कायदा व सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी पोलिस विभागाला गरजेच्या वेळेस सेवा देणाऱ्या होमगार्ड संघटना स्थापनेला ७८ वर्ष पूर्ण झाल्याने धुळे जिल्हा होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या आदेशाने थाळनेर होमगार्ड पथकाने तब्बल सात दिवस स्वच्छता अभियान राबवून हा वर्धापन दिन साजरा केला. या सात दिवसाच्या कालावधीत थाळनेर पोलिस स्टेशन,ग्रामीण रुग्णालय,स्वामी समर्थ केंद्र, भुईकोट किल्ला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान यासह गावातील आदी ठिकाणी स्वच्छ्ता अभियान राबवून मोट्या उत्साहाने हा सप्ताह साजरा करण्यात आला.
होमगार्ड संघटनेचा वर्धापन दिवस साजरा करीत असताना राबविलेल्या स्वच्छता अभियानात पथकाचे समादेशक निंबा पाटील,शालीग्राम माळी,दिनेश मराठे,प्रदिप मराठे, गोपाल जाधव,चंद्रकांत पाटील,विजय निकुंभे,प्रविण पाटील,छोटू पाटील,रविंद्र पाटील,सुनिल चौधरी,हेमराज राजपुत,वसंत वाडीले,नीळकंठ मराठे,संजय सावळे,भास्कर शिंपी,विकास बिऱ्हाडे,रामकृष्ण निकम,मंगल राजपूत,शकील खाटीक,अफसर शेख,विरपाल राजपूत,संजय कुंभार,मुकेश कोळी तसेच महिला होमगार्ड मंगला मराठे, मिनाक्षी भोई, यांच्यासह आदी होमगार्ड जवानांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

