राज्यातील आश्रमशाळांची वेळ सकाळी 8:45 ते 4 अशी आहे. सध्या कडाक्याचा थंडीने सारेच हैराण आहेत. ही वेळ अमानवीय असून विद्यार्थी, पालक व कर्मचारी यांना मानासिक तसेच शारिरीकदृष्ट्या आणि शालेय अध्ययन, अध्यापन दृष्टीने उचित नसून ती बदलविण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धुळे जिल्हा भाजपचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व प्रसिद्धी प्रमुख मोतीलाल पोतदार यांच्या शिष्टमंडळ महाराष्ट्र शासना तर्फे आदिवास विभागाकडून चालविण्यात येणाऱ्या शासकिय व अनुदानित आश्रमशाळेच्या वेळेत बदल करावा या बाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
शाळांची वेळ सकाळी 11ते 5 वाजेपर्यंत करावी अशी मागणी जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा प्रासिद्धी प्रमुख मोतीलाल पोतदार, जिल्हा चिटणीस प्रमोद गांगुर्डे, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल मुसळे, पिंपळनेर मंडळ उपाध्यक्ष चंद्रशेखर बाविस्कर आदींनी निवेदनाव्दारे केली आहे.
प्रतिनिधी तुषार देवरे
झेप मराठी, देऊर.