धुळे शहरातील पोलिसांनी, प्रशासनाची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या कारवाईनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने धुळे शहरात बांगलादेशी नागरिकांच्या वाढत्या वस्तीच्या पार्श्वभूमीवर कोंबिंग ऑपरेशन राबवण्याची मागणी करत आज दिनांक २४ डिसेंबर रोजी शासनाला निवेदन दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई धुळे शहरातील जातीय तणाव आणि अवैध रहिवाशांच्या वाढत्या संख्येमुळे आवश्यक आहे, ज्यामुळे भविष्यात सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी हे स्पष्ट केले की, धुळे शहरातील बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य वाढत आहे. धुळे शहर हा महाराष्ट्रातील चार महत्त्वपूर्ण महामार्गांवर वसलेला आहे, आणि रोजगाराच्या शोधात येथे अनेक लोक येत असतात. सध्या, धुळे शहरात मोहाडी उपनगर, एमआयडीसी, पारोळा रोड, आणि एकविरा देवी मंदिरासमोर काही लोक छोटे तंबू टाकून राहत आहेत. या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदाय आहे. 2008 आणि 2011 मध्ये धुळे शहरात जातीय दंगल झाली होती, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत, या भागात बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवणे आवश्यक आहे. या संदर्भात एक निवेदन जारी करण्यात आले . ज्यात सांगितले कि , बांगलादेशी नागरिकांची वाढती संख्या आणि त्यांच्या अवैध वास्तव्यामुळे शहरात तणाव निर्माण होऊ शकतो. या संदर्भात, पोलिस प्रशासनाने सध्या शहरातील सर्व लॉजेस आणि इतर ठिकाणांची तपासणी करणे गरजेचे आहे.
हे निवेदन शासनाला देताना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपनेता शुभांगी पाटील, मा.आ.अनिल गोटे, मा.आ. शरद पाटील, भगवान करणकाळ, महानगर प्रमुख धीरज पाटील , नरेंद्र परदेशी ,विजय वाघ , प्रशांत भदाणे,भरत मोरे,ललित माळी ,संदीप सूर्यवंशी , निंबा नाना मराठे, विनोद जगताप, आण्णा फुलपगारे, सुभाष मराठे, कैलास मराठे,महादु गवळी, मनोज शिंदे, शिवाजी शिरसाळे, पंकज भारस्कर, मुन्ना पठाण, निलेश कांजरेकर,अजय चौधरी, अनिल शिरसाट, विष्णू जावडेकर, पिंटु ठाकूर, चंद्रकांत हजारे ,डॉ. सोमनाथ चौधरी ,सचिन पोतेकर ,गौरव सूर्यवंशी, डॉ.अनिल पाटील ,सुरेखा नांद्रे , चेतन पाटील, मयूर खैरनार, नंदू भामरे, सागर साळवे , सागर निकम हे उपस्थित होते.
प्रतिनिधी कार्तिक सोनावणे
झेप मराठी धुळे.