नाशिकहून धुळे मार्गे जळगावकडे जाणाऱ्या प्रवाशास लुटणाऱ्या अट्टल चोरट्याला तालुका पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. वसिम उर्फ वड्या सलीम रंगरेज राहणार धुळे , असे ह्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून मोबाइलसह ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तेजस महेंद्र सोनवणे रा. दापोरे जि . जळगाव हे आपल्या बलेरो कार ने नाशिकहून जळगावकडे जात असताना त्यांना झोप येऊ लागल्याने त्यांनी धुळ्यानजीक बाळापूर शिवारात असलेल्या हॉटेल कल्पेशजवळ त्यांनी गाडी उभी करून गाडीत झोपले. याचा फायदा घेत आरोपीने गाडीचा दरवाजा उघडून त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील ३६ हजार किमतीचा मोबाईल आणि ३ हजार रुपये रोख घेऊन पलायन केले.
या घटनेची धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोउनि कृष्णा पाटील, पोहवा कुणाल पानपाटील, पोहवा-उमेश पवार, पोहवा- हर्षल धनगर, पोना-संदीप शिंदे पोका-विशाल पाटील, पोकॉ-धिरज सांगळे, पोकॉ रविंद्र सोनवणे यांनी वेगात तपासचक्रे फिरवली . तांत्रिक पद्धतीने तपासाला वेग देऊन वसिम उर्फ वड्या सलीम रंगरेज (३९) राहणार शब्बीर नगर , धुळे यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असुन त्याच्याकडून चोरीस गेलेला ३६ हजार किमतीचा मोबाईल आणि ५०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे , अपरअधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली.
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे
झेप मराठी धुळे