धुळे- नेर जि.प.गटाचे सदस्य आनंदराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने नेर जि.प.गटातील विविध गावांमध्ये विकास कामांचे भूमीपुजन करण्यात आले.त्यात अमरधाम बैठक व्यवस्था बांधकाम करणे,पेव्हर ब्लॉक बसविणे, अंगणवाडी बांधकाम करणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांनी सुमारे 55 लक्ष रुपयाचा निधी विविध योजनेतून मंजूर केला आहे.
आ.अमरिषभाई पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून भदाणे येथे अमरधाम बैठक व्यवस्था (रक्कम 5 लक्ष रु.), खंडलाय बु. येथे अमरधाम येथे बैठक व्यवस्था(रक्कम 5 लक्ष रु.), खंडालाय खु. येथे अमरधाममध्ये कॉक्रीटीकरण करणे(रक्कम 5 लक्ष रु.), बांबुर्ले येथे गावदरवाजापासून पेव्हर ब्लॉक बसविणे(रक्कम 5 लक्ष रु.) ही कामे होत आहेत. तर बालविकास विभागातून भदाणे येथे आंगणवाडी इमारत बांधकाम करणे रक्कम रु.11लक्ष, बांबुर्ले येथे आंगणवाडी इमारत बांधकाम करणे रक्कम रु.11 लक्ष रुपये, बांबुर्ले येथे पंधरावा वित्त आयोगातून पाणी पुरवठासाठी विहीर खोदकाम करणेसाठी 6 लक्ष रु., खंडलाय बु. येथे जनसुविधेअंतर्गत नवीन स्मशानभूमी बांधकाम करणे(रक्कम 7.50 लक्ष रु.) या कामांचा नुकतेच भूमीपूजन करण्यात आले.
जि.प.सदस्य आनंदराव पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य आनंदराव पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच भीमा दादा, उपसरपंच विठ्ठल पाटील ,माजी सरपंच दीपक पाटील ,विलास माळी ,कांतिलाल भिल ,तुकाराम माळी ,विश्वास पाटील ,तात्या भिल, प्रभाकर माळी, कैलास कोळी, आप्पा कोळी, रोहिदास भिल , गटप्रमुख आबा पगारे, कैलास कोळी ,विठ्ठल भिल ,भीमराव पाटील ,दौलत बागुल ,योगेश देशमुख ,प्रमोद पाटील ,रवींद्र पाटील ,विजय आबा ,युवराज तात्या ,सदाशिव आबा ,वामन दादा ,प्रकाश दादा ,प्रशांत भाऊ ,राहुल भदाने ,हिम्मत दादा, शांताराम पवार ,भैया देवरे ,भिकण नाना ,प्रकाश भदाने ,दादा कोळी ,मुश्ताक पिंजारी ,सरपंच भग्रताताई पाटील, पुंडलिक बापू ,नवल सर ,भगवान माळी ,राजधर पाटील, मनवर पिंजारी ,जगदीश पाटील ,भटू पाटील ,समाधान पदमार, शंकर बैरागी, भैया पाटील ,शालिक पाटील ,आदि आजी माजी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आज झालेल्या विकास कामाबद्दल नेर गटातील जनतेकडून जि.प. सदस्य आनंदराव पाटील यांचे भरभरून कौतुक करण्यात येत आहे व पुढे असाच नेर गटाचा विकास आपल्या हस्ते व्हावे असे देखील तेथील उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी म्हटले
प्रतिनिधी तुषार देवरे
झेप मराठी देऊर
