धुळ्यातील एस एस व्ही पी एस कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष व इंग्रजी विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी ‘एनईपी फॉर स्टेक होल्डर्स’ या विषयावर एका दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी कबचौ,जळगाव मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ जगदीश पाटील यांनी सृजशीलता आणि कौशल्य यांचा विकास म्हणजे NEP 2020 आणि रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र वाघ यांनी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आजचा विद्यार्थी या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत दुसऱ्या सत्रांमध्ये प्राचार्य डॉ.उदय जगताप, धरणगाव महाविद्यालय यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणि उच्च शिक्षणातील आव्हाने या विषयावर प्रकाश टाकला तर सत्र अध्यक्ष प्रा.डॉ. मोहन पावरा यांनी यांनी उच्च शिक्षणातील आव्हाने आणि आपली भूमिका या विषयावर आपली भूमिका मांडली. कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात प्रा.डॉ. हेमंत जोशी, पालेशा, महाविद्यालय धुळे यांनी NEP 2020 आणि अभ्यास क्रमातील विविध आयाम या विषयी मार्गदर्शन केले, तर सत्र अध्यक्ष प्रा डॉ.संजय घोडसे यांनी NEP 2020 आणि अभ्यास क्रमातील विविध आयाम यांचा सांगड यावर मार्गदर्शन केले.चौथ्या सत्रात प्रा.डॉ. दिनेश भक्कड, शिरपूर महाविद्यालय यांनी आपल्या भाषणात नवे शैक्षणिक धोरण आणि ऑनलाईन कोर्सेस या विषयावर मार्गदर्शन केले. तर सत्र अध्यक्ष प्रा. डॉ.जितेंद्र तलवारे यांनी नवे शैक्षणिक धोरण आणि ऑनलाइन कोर्सेस ची उपलब्धता यावर प्रकाश टाकला.
कार्यशाळा समन्वयक व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिपक एस चौधरी व गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. दिपक डी देवरे यांनी मार्गदर्शन केले. सूत्र संचलनाची जबाबदारी प्रा. डॉ.भाऊसाहेब देसले यांनी पाडली तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ.अमोल पाटील सर यांनी केले.
सदर कार्यशाळे च्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्र वाघ, प्रा. डॉ.मोहन पावरा, प्रा.डॉ. जितेंद्र तलवारे, प्रा. डॉ.सुरेश आगळे,प्रा.डॉ.प्रशांत वानखेडे, प्रा.वैशाली चिंतामणी प्रा.दिपाली सोनवणे व सर्व सन्मान निय प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यशाळेसाठी धुळे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.