जयहिंद हायस्कूल संलग्न जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे (एनएसएस) विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन १ ते ७ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले. हे शिबीर धुळे जिल्ह्यातील वार तालुक्यात असणाऱ्या केंद्रीय आश्रम शाळेत मोठ्या उत्साहाने पार पडले.
१ जानेवारी रोजी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती कल्याणी पाटील (महिला पोलीस उपनिरीक्षक, भरोसा सेल व दामिनी पथक प्रमुख) उपस्थित होत्या. तसेच शालेय समितीचे चेअरमन श्री निलेश गुलाबराव पाटील हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. सोबतच संचालक भूषण सावंत, आदर्श शैक्षणिक संकुल अध्यक्ष महेंद्र विसपुते, प्राचार्य वसंत बैसाणे, सरपंच दिलीप पाटील, उपप्राचार्य मनीषा करंदीकर, प्राध्यापक श्री संजय देवरे, प्राध्यापक सागर चौधरी यांच्यासह शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
७ जानेवारी रोजी या शिबिराचा समारोप सोहळा झाला. यावेळी प्रमुख मनोगतात श्रीमती कल्याणी पाटील यांनी कौटुंबिक हिंसाचार ,लैंगिक अत्याचार, हुंडाबळी ,वैवाहिक वाद ,कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले . तसेच प्राध्यापक आर जे साने यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक व व्यक्तिमत्व विकास आपत्ती व्यवस्थापनात स्वयंसेवकाची भूमिका , भावी जीवनासाठी एनसीसी, एनएसएस ,स्काऊट गाईड हे विषय किती महत्त्वाचे आहेत, याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. तसेच मोहन मोरे यांनी एकत्र कुटुंब पद्धती सामाजिक क्षेत्रातील वृद्धाश्रम शेतकरी कुटुंबाची अवस्था ,विभक्त कुटुंब पद्धतीची अवस्था व एनएसएस ची त्याबाबतची भूमिका या विषयावर प्रबोधन केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा समन्वयक प्राध्यापक आर जे साने, कुवर सर हे होते. समारोप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक मोहन मोरे हे होते. तसेच यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब चंद्रशेखर पाटील, संस्थेचे संचालक डॉ.नितीन काकडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संजय देवरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बच्छाव आणि शितल बच्छाव यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमलता ठाकरे , योगेश सोनवणे यांनी केले.
शिबिर यशस्वी करण्यात प्रा सागर चौधरी , वीरेंद्र परदेशी, प्रा अतुल पाटील ,प्रा नितीन पाटील , राजदीप काकडे ,प्रा लक्ष्मण काळे ,शिपाई नंदकुमार पाटील , अमोल साळवे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. याबाबत संस्थेचे अध्यक्ष विजय पितांबर पाटील संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब चंद्रशेखर पाटील संस्थेचे सचिव शरद बच्छाव, प्राचार्य, उप प्राचार्य, पर्यवेक्षक व सर्व संचालक मंडळ यांनी कौतुक केले आहे.