नंदुरबार नवापूर तालुक्यात सरपणी नदीला पुर आल्याने सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी येथील पुलावरुन पाणी वाहत आहेत. त्यामुळे सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून येणारी सर्व वाहने उच्छल-दहिवेल-नंदुरबार मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच डोकारे कारखान्याजवळ जिल्हा रस्ता मार्ग बंद करण्यात आला आहेत. असे जिल्हाप्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
