अलीकडे सायबर क्राईम चा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, आणि धुळ्यात त्याचे एक भयानक उदाहरण समोर आलं आहे. एका इलेक्ट्रीकल फर्मच्या मालकाला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे (MSEDCL) MD बनवून चक्क १३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय.
झालं असं कि धुळ्यातील जय श्री कृष्ण इंटरप्रायझेस या इलेक्ट्रीकल फर्मचे मालक जिजाबराव पाटील याना १३ सप्टेंबर २०२४ रोजी अचानक धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा फोन आला. ज्यामध्ये सांगण्यात आलं कि , MSEDCL चे MD लोकेश चंद्रा यांना तात्काळ तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. थोड्याच वेळात अनोळखी नंबरवरून कॉल आला, ज्यामध्ये कॉल करणाऱ्याने सांगितले, “मी लोकेश चंद्रा बोलतोय, माझ्या अंकलला हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं आहे, त्यामुळे 8 लाख रुपये तात्काळ पाठवा, मी तुम्हाला संध्याकाळी पैसे परत करीन.”
फिर्यादीने विश्वास ठेवून नेट बँकिंग RTGS ने 8 लाख रुपये पाठवले. दोन तासांनी परत कॉल करून ..कॉल करणार्याने आणखी 5 लाख रुपये मागितले. या वेळी दहिसर मुंबई येथील खाते नंबर दिला आणि जिजाबराव पाटलांनी ते पैसेही पाठवले. परंतु जेव्हा सायंकाळी पैसे पार्ट आले नाही तेव्हा फिर्यादीने
सायंकाळी आरोपीच्या फोनवर कॉल केला .. मात्र त्याने फोन घेतला नाही. मग कार्यकारी अभियंता श्री. जोशी यांच्याकडून श्री. लोकेश चंद्रा यांचा नंबर घेऊन संपर्क साधला. तेव्हा चंद्रा यांनी पैशांची मागणी केली नसल्याचे सांगितले आणि फिर्यादींना सायबर फसवणुकीची जाणीव झाली.
त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि ४ महिन्याच्या तपासानंतर, सुरत येथून यशवंत काशिनाथ पाटील,जयशंकर गोपाल गोसाई,
विजय शिवहरी शिरसाठ या तीन आरोपींना अटक करण्यात आलीय.
ही कारवाई अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस पथकाचे. पोलीस निरीक्षक श्री. घुसर, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रतीक कोळी, यांच्या पथकाने केली..