जिल्ह्यातील युवक, युवतींना इस्त्राईल मध्ये रोजगाराची सुवर्णसंधी

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (होम बेस केअर गिव्हर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी जिल्या वतील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या अधिकृत संकेतस्थळावर आपली माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जिल्ह्यातील युवक युवतींना इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (होम बेस केअर गिव्हर) या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या व 25 ते 45 वर्षे वयोगटातील उमेदवार यात सहभागी होण्यास पात्र आहे. उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र (ऑन जॉब ट्रेनिंग सह) असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण, जीडीए/ एएनएम/ जीएनएम/ बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

इस्राईलमध्ये नोकरीसाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून केले जाणार आहे. मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही करण्यात आली आहे. तसेच पात्र उमेदवारांना दरमहा 1 लाख 31 हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, प्रशासकीय संकुल, धुळे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री.वाकुडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top