धुळे : श्री. शि.वि.प्र. संस्थेचे ना.स.पाटील साहित्य आणि मु.फि.मु.अ. वाणिज्य महाविद्यालयात “महिलांसाठी असणाऱ्या विविध विकास योजना” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
ही कार्यशाळा विद्यार्थी विकास विभागाच्या युवती सभेच्या अंतर्गत घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डी. वाघ सर होते, तर प्रमुख वक्त्या म्हणून अँड. गायत्री भामरे मॅडम आणि श्रीमती भावना पाटील मॅडम उपस्थित होत्या.
कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. मनीषा कचवे मॅडम यांनी या कार्यशाळेचे उद्दिष्ट व रूपरेषा विद्यार्थिनींसमोर मांडली. प्रमुख वक्त्या अँड. गायत्री भामरे मॅडमयांनी मार्गदर्शन करताना विविध कायद्यांबाबत विद्यार्थिनींना सखोल माहिती दिली. तसेच, बाल संरक्षण विभागाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेत त्यांनी महाराष्ट्रातील बालविवाहाच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. धुळे जिल्हा बालविवाह प्रकरणांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या प्रमुख वक्त्या श्रीमती भावना पाटील मॅडम यांनी सखी वन स्टॉप सेंटर योजनेबाबत माहिती दिली आणि महिलांना मिळणाऱ्या सेवा व मदतीबाबत विद्यार्थिनींना जागरूक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भाग्यश्री पाटील मॅडम यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय व सत्काराची जबाबदारी प्रा. डॉ. पौर्णिमा वानखेडे मॅडमयांनी पार पाडली. आभार प्रदर्शनाचे काम अश्विनी भामरेयांनी केले.
कार्यशाळेला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. निलेश पाटील, महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. कल्पना पाटील मॅडम, प्रा. डॉ. क्रांती पाटील मॅडम, आणि विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
ही कार्यशाळा महिलांसाठी असलेल्या विकास योजनांबाबत विद्यार्थिनींना जागरूक करत, त्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरली.
