अक्कलपाडा प्रकल्पातून विसर्ग
धुळे प्रतिनिधी: धुळे आणि साक्री तालुक्यांच्या सीमा रेषेवर असलेल्या अक्कलपाडा निम्मं पांझरा प्रकल्पाच्या क्षेत्रात 2, 3 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रकल्पात पाणी पातळी वाढली आहे. या प्रकल्पातून पांझरा नदी पत्रात 2 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग होतो आहे. पुढील 72 तासात अजून पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही नदी पत्रात गुरे ढोरे घेऊन जाऊ नये, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे.