मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा गेमचेंजर प्रवास सुरू!
महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशाला दिशा दाखवली आहे! गुन्हे सिद्धतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या व्हॅनचे लोकार्पण सह्याद्री अतिथीगृह येथे उत्साहात पार पडले.
‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ म्हणजे काय?
आता गुन्हेगारांना वाचण्यासाठी कोणतीही पळवाट मिळणार नाही! विज्ञान, तंत्रज्ञान आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची कसरती एकत्र येऊन महाराष्ट्रात २५९ व्हॅन्स कार्यरत होणार आहेत. त्यातील २१ व्हॅन्स पूर्णपणे सुसज्ज असून, गुन्ह्याच्या स्थळावरच पुरावे गोळा करून बारकोडच्या माध्यमातून त्यांना सुरक्षित ठेवले जाईल.
गुन्ह्यांच्या तपासात आणखी वेग
या व्हॅनमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत, जसे की:
- रक्त व डीएनए संग्रहण
- बलात्कारासारख्या गुन्ह्यात पुरावे गोळा करण्याची प्रणाली
- सायबर गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक किट्स
- स्फोटक पदार्थ तपासणी तसेच, सीसीटीव्ही कनेक्टेड व्हॅन्स आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर यामुळे पुरावे गोळा करण्यापासून त्यांचे दस्तऐवजीकरण आणि पोलीस स्टेशनला रिपोर्ट सुपूर्द करणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
गुन्हेगारांसाठी घातक ‘फॉरेन्सिक सिस्टम’!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गुन्हेगारांना आता पुराव्यांशी छेडछाड करणं अशक्य होणार आहे.यामुळे गुन्हे सिद्धतेचं प्रमाण प्रचंड वाढेल, आणि न्यायसंस्थेतील विश्वासार्हता अजूनच दृढ होईल.
कसे काम करेल ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’?
- गुन्हा नोंदवल्यावर फॉरेन्सिक पथकाला सूचित केलं जाईल.
- घटनास्थळी पोहोचून फॉरेन्सिक तज्ज्ञ क्राईम सीन ॲप्लिकेशनच्या मदतीने पुरावे गोळा करतील.
- छायाचित्रे आणि व्हिडिओंच्या माध्यमातून घटनास्थळाचे दस्तऐवजीकरण होईल.
- वरिष्ठ तज्ज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला जाईल.
- गोळा केलेले पुरावे सील करून क्राईम सीन रिपोर्ट पोलीस तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाईल.
गुन्हेगारीवर वचक बसवणारा प्रकल्प
राज्यात गुन्हेगारीला रोखण्यासाठी अत्याधुनिक आणि जलद तपास प्रक्रियेचा महत्त्वाकांक्षी आराखडा साकारला जात आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक विभागात समन्वय साधून गुन्ह्यांचं मूळ शोधलं जाईल
