धुळे : देवपूर पोलिस ठाण्याच्या शोध पथकाने अवघ्या २४ तासांत दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्यातील आरोपींना तपास पथकाने यशस्वीपणे ताब्यात घेतले असून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिराबाई नरहरी सोनार (वय ६४), मागदेव बाबा मंदीर, विटाभाटी, देवपूर येथील रहिवासी यांनी पोलिसांकडे तक्रार केली की, त्यांच्या घराचे कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात करून कपाटात ठेवलेल्या एका प्लास्टिक च्या बरणीतील १०,००० रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे ६१,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला .
देवपूर पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवली आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, हरीश उर्फ सनी कैलास चौधरी (वय २४), हुकुम रमेश चव्हाण (वय २४), आणि कल्पेश यादव कानडे (वय २२) यांना ताब्यात घेतले . हे सर्व आरोपी विटाभाटी, देवपूर येथील रहिवासी आहेत. तपासादरम्यान त्यांची चौकशी केली असता, त्यांनी पोलिसांना कबिला दिली की, त्यांनीच घरफोडी केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला, तसेच इतर ठिकाणी केलेल्या घरफोड्यांमधून एक इन्व्हर्टर आणि बॅटरी देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे.
हि कारवाई ही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे ,उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपन्य यांच्या मार्गदर्शनाखाली देवपुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी धंनजय पाटील, असई मिलींद सोनवणे, पोहेकों दिपक विसपुते, पोहेकॉ महेन्द्र भदाणे, पोहेको ईश्वर पाटील, पोकॉ प्रविण पाटील, पोकॉ राहुल गुंजाळ, पोकों भटेन्द्र पाटील, पोकों वसंत कोकणी, पोकों सौरभ कुटे, पोकों नितीन चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलोस निरीक्षक श्रीराम पवार, पोहेकॉ मुकेश वाघ, पोहेकॉ शशिकांत देवरे यांच्या मदतीने केली .
प्रतिनिधी कार्तिक सोनवणे
झेप मराठी धुळे.
