धुळे ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रा पाटील हे सध्या काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. पूर्वा श्रमीचे काँग्रेसी असलेल्या प्रा पक्तही यांनी त्या वेळी बंड करून काँग्रेसच्या विरोधात दंड थोपटले. मंत्री रोहिदास पाटील यांच्या विरोधात टोकाचे राजकारण केले. पहिल्या पराभवानंतर प्रा पाटील यांनी थेट रोहिदास पाटील यांचा पराभव करून राज्याचे लक्ष वेधून घेतले. मातोश्री वर ही त्यांना चांगले स्थान मिळाले. मात्र विद्यमान आमदार असताना सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा आमदार कुणाल पाटील यांनी पराभव केला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत प्रा शरद पाटील यांना धुळे शहरातून उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांचे शिवसेनेशी ही वाद झालेत आणि त्यांनी बाहेर पडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला. गम्मत अशी की ज्यांच्या विरोधात राजकारण केले त्यांच्या सोबत किंबहुना त्यांनाच नेते मानून राजकारण करताना प्रा शरद पाटील काहीसे अस्वस्थ होते. मधल्या काळात त्यानी राष्ट्रवादी च्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण सूर जुळून आला नाही.सेनेशी नाते तुटले आणि काँग्रेस शी नीट जमेना , अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या प्रा शरद पाटील यांना जावे कुठे ? असा प्रश्न गेल्या काही दिवसापासून त्यांना भेडसावत होता. अखेर मातोश्री वर जाऊन त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून हातात शिव बंधन बांधून घेतले आहे. प्रखर हिंदुत्व…धर्म निरपेक्षता.. आणि आता परत हिंदुत्व…असा प्रवास प्रा शरद पाटील त्यांना कुठे जाईल हे बघू या…
