धुळे तालुका पोलिसांची कामगिरी
भाडेतत्वावर आलिशान कार घेऊन त्यांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धुळे तालुका पोलिसांनी या संदर्भात २ वाहनांसह ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे राहणारे अभिषेक शिवाजी पाटील यांना कार खरेदी करायची असल्याने त्यांनी शोध सुरु केला त्यावेळी सोशल मीडिया वर त्यांना महिंद्रा कंपनीची थार (TS ०७KB ७००४) हि कार विक्रीस असल्याचे समजले. त्यांनी आरोपी अरबाज नसीमशेख , अजरुद्दीन अब्दुल रज्जाक आणि सय्यद अबरार अकबर अहमद यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कार पाहण्यासाठी शिरुड चौफुलीवर बोलावले, ६ लाख रुपयात सौदा ठरला , ३ लाख रुपये घेऊन हि कार अभिषेक पाटील यांच्या ताब्यात दिली. उर्वरित रक्कम वाहन नावावर करून दिल्यानंतर देण्याचे ठरले परंतु नंतर या तिघांनीही प्रतिसाद देणे बंद केले.
दरम्यान १० दिवसांनंतर काही व्यक्तींनी अभिषेक पाटील यांना भेटून या कारला gps सिस्टीम असल्याने आपल्यापर्यंत पोहोचलो असे सांगत हि कार आपल्या मालकीची असल्याचे सांगितले आणि कार घेऊन निघून गेले. कार घेऊन जाणाऱ्या व्यक्तींची नावे मो. मझर अहमद इत्तेकार अहमद सिद्दीकी , मोहमद अब्दुल्लाबीन सैफ आणि सय्यद शहा फवाद सर्व रा. हैद्राबाद असे आहेत.
आपली फसवणूक झाल्याचे अभिषेक पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी नाव बदलून पुन्हा आधीच्याच आरोपींशी संपर्क साधून कार खरेदी करायची आहे असे सांगितले . या आरोपींनी त्यांना पुन्हा शिरुड चौफुलीवर बळावून मारोती सुझुकी हि कार दाखवली. हे तेच आरोपी असल्याचे अभिषेक पाटील यांनी ओळखल्याने आरडाओरड करून त्यांनी तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी यांच्यासह ती कार घेऊन जाणाऱ्या तिघांनाही अटक करून एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे . त्यांच्याकडून थारसह २ कार जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपरअधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील तसेच छाया पाटील, कुणाल पानपाटील , उमेश पवार , विशाल पाटील, ललित खळगे , योगेश पाटील, अविनाश गहिवड , चेतन कंखरे , योगेश कोळी, धीरज सांगळे , सखाराम खांडेकर, राजू पवार आणि भावेश झिरे यांनी केली .