निजामपूर तालुक्यातील खुडाणे शिवारातील शेतमळयात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एक गिरगाईचे वासरू ठार झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. ही घटना सोमवार, 10 फेब्रुवारीच्या पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान घडली. शेतमालक दुल्लभ दयाराम माळी यांच्या शेतात असलेल्या गोठ्यात हा प्रकार घडला. पहाटे या घटनेची शेतमालकासह परिसरातील शेतकऱ्यांना माहिती मिळाल्यामुळे सर्वत्र भीती पसरली आहे.
शेतमालक दुल्लभ माळी यांनी सांगितले की, ते नेहमीप्रमाणे पहाटे शेतात गेले होते, तेव्हा त्यांना गोठ्यातील गिरगाई वासरावर वन्यप्राण्यांनी हल्ला करत त्याला ठार केल्याचे दिसले. या परिसरात रात्रपाळी करत असताना, शेतकऱ्यांना बिबटया संचार करत असल्याचे देखील दिसुन आल्याचे बोले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच, कोडाईबारी वनक्षेत्र अधिकारी आणि वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचारी चंदू तडवी आणि इतरांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दुल्लभ माळी यांनी, या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी वनविभागाकडे केली आहे.
यापूर्वी देखील खुडाणे शिवारात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दोन जनावरे ठार झाल्याची घटना घडली होती, ज्यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांची सुरक्षा आणि भरपाईसाठी वनविभागाला योग्य पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी हेमंत महाले
झेप मराठी निजामपूर
