धुळे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३.२५ लाख रुपये किमतीच्या १० मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
तक्रारदार दिपक वंजारी (वय २८, रा. हाडाखेड, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, २४ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११.३० वाजता त्यांच्या अंगणातून काळ्या रंगाची हिरो एचएफ डिलक्स (MH 18 BT 3058) ही मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरली होती. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, गमदास उर्फ गमा देवराम भिल (वय २०, रा. पळासनेर, ता. शिरपूर) हा मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात सामील आहे आणि तो पळासनेर गावातील चारणपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्पीड ब्रेकरजवळ उभा आहे.
या माहितीनुसार, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेल्या १० मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून या दुचाकींची एकूण किंमत ३.२५ लाख रुपये आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी –
१. हिरो एचएफ डिलक्स (काळ्या रंगाची, विना नंबर) – ₹२५,०००
२. हिरो एचएफ डिलक्स (लाल-काळ्या रंगाची) – ₹३५,०००
३. हिरो एचएफ डिलक्स (एमपी ०९ एमआर ७९३९, लाल-काळ्या रंगाची) – ₹३५,०००
४. हिरो होंडा स्प्लेंडर (काळा-निळा-सिल्व्हर रंग, विना नंबर) – ₹२५,०००
५. हिरो होंडा स्प्लेंडर (काळा-निळा रंग, विना नंबर) – ₹२५,०००
६. होंडा शाईन (एमपी ४६ एमएन ५२१३, लाल-काळ्या रंगाची) – ₹५०,०००
७. यामाहा फेजर (ग्रे-ब्लू रंगाची) – ₹६०,०००
८. बजाज एक्ससीडी १२५ (काळा-नारंगी रंगाची, MH 41 N 829) – ₹२०,०००
९. हिरो होंडा पॅशन प्रो (काळा-निळा रंग, विना नंबर) – ₹२५,०००
१०. हिरो पॅशन प्रो (GJ 05 SB 2432, काळा-लाल रंगाची) – ₹२५,०००
ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार , स.पो.नि. संजय पाटील, पोहेकॉ. पवन गवळी, आरिफ पठाण, संतोष हिरे, देवेंद्र ठाकूर, सुरेश भालेराव, पंकज खैरमोडे, पोकॉ. मयूर पाटील, सुनिल पाटील यांच्या पथकाने केली.
प्रतिनिधी कार्तिक सोनावणे
झेप मराठी धुळे.