दोंडाईच्यातील आदिती हेमराज पाटील हिने जेईई परीक्षेत देशभरातून ३८०वा रँक मिळवून मोठे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण शहरात आनंद आणि कौतुकाचे वातावरण आहे.
आदिती ही साई कला हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमराज पाटील आणि डॉ. जयश्री पाटील यांची कन्या आहे. ती के. व्ही. टि. आर स्कूल, शिरपूर येथे शिक्षण घेते . तिच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे तिला हे मोठे यश मिळाले आहे.
आदितीच्या या यशामुळे तिच्या मूळगावी विखरण आणि सध्या वास्तव्य असलेल्या दोंडाईच्यात आनंदाचे वातावरण आहे. शहरातील शशिकांत राजपूत, चेतन राजपूत आणि अनेक मान्यवरांनी तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तिच्या या मोठ्या यशामुळे दोंडाईच्याचे नाव देशभरात उजळले असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वजण तिला शुभेच्छा देत आहेत.
प्रतिनिधी समाधान ठाकरे
झेप मराठी दोंडाईचा.
