साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील नवेनगर येथिल पंडित मोतिराम साबळे(वय५५) याचा टाकळी नाल्याला आलेल्या पुरात वाहुन म्रुत्यु.
परवा पंडीत साबळे हा ५५वर्षे वयाचा शेतकरी कामासाठी शेतात गेला होता .शेतातून परतत असताना टाकळी नाल्यातुन ऊतरतांना पाण्याचा प्रवाह लक्षात आला नाही व तो पुरात वाहून गेला ही घटना दी.११रोजी घडली सदर शेतकरी रात्री घरी आला नसल्याने घरचे नातेवाईक व नागरिकांनी शोधाशोध केली मात्र दुसर्या दीवशी पाऊस ऊघडल्यावर पंडीत साबळे पुरात वाहुन म्रुत आवस्थेत नाल्यात आढळले .घटना स्थळी, गावकरी,सरपंच, पोलीस पाटील, पोलीस व महसूल विभागाचे तलाठी दीपक बागुलयांनी पंचनामा करून पी.एम साठी ग्रमिण रुग्णालयात दाखल केले व पी.एम करून अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत पंडीत साबळे यांच्या पच्यातपत्नी,१मुलगा,१मुलगी असा परीवार आहे. शासनाने मयताच्या नातेवाईकांना मदत लवकरात लवकर द्यावी अशी मागणी केली जात आहे.