पुन्हा एक अतुल सुभाष l टीसीएस कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या; पत्नीला ठरवले जबाबदार!

आग्रा: काही महिन्यांपूर्वी बंगळुरूमधील अतुल सुभाष या इंजिनीअरने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता अशाच धक्कादायक घटनेत आग्रा येथे मानव शर्मा या नामांकित कंपनीतील मॅनेजरने आपल्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
टीसीएस कंपनीत मॅनेजर असलेल्या मानव शर्माने २४ फेब्रुवारीला फाशी घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्याने ६ मिनिटे ५६ सेकंदांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून, त्यात पत्नीच आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे.

🔹 व्हिडीओत काय म्हणाला मानव शर्मा?
मानव शर्माने आपल्या शेवटच्या संदेशात गंभीर आरोप करत “पुरुषांचा आवाज ऐकला गेला नाही, तर अशाच घटना घडतील,” असे म्हटले आहे. हल्ली पुरुष खूप एकटे पडले आहेत. महिलांकडून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. कायद्याने पुरुषांनाही संरक्षण द्यायला हवे,” अशी मागणी त्याने या व्हिडीओतून केली आहे.

-“माझ्या पत्नीचे परपुरुषाशी संबंध असल्याचे कळले. पण आरोप मात्र माझ्यावर केले गेले. मला धमकावण्यात आले. त्यामुळेच मी हा निर्णय घेत आहे.”
-“पप्पा सॉरी, मम्मी सॉरी. मी गेल्यानंतर सगळं ठीक होईल.”
-“मी आधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण आता माझ्या मनात शंका नाही.”
मानव शर्माने मनगटावरील कापलेल्या जखमा देखील व्हिडिओत दाखविल्या आहेत. व्हिडिओ शेवटी त्याने “माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नका” अशी विनंती केली आणि रेकॉर्डिंग बंद केले. त्यानंतर त्याने आपले जीवन संपवले.

🔹 पोलिसांचा तपास सुरू
मानव शर्माच्या आत्महत्येचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे पुरुषांच्या हक्कांसंदर्भात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी आमच्या सोबत राहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top