शासनाचा महसूल थकविल्याप्रकरणी मोबाईल टॉवरवर महसूल विभागाची कारवाई

शासनाचा महसूल थकविल्याप्रकरणी महसूल विभागाने थकबाकी असणाऱ्या मोबाईल टॉवरला सील करण्याची मोहीम शिरपूर तहसील कार्यालयाने सुरु केली आहे. त्यानुसार शिरपूर तालुक्यातील मौजे अर्थे येथे इंडस व आइडिया कंपनी टॉवर सील करण्यात आले आहे.

शिरपूर तालुक्यात इंडस, आइडिया, बीएसएनएल, जिओ अशा विविध कंपनीचे 123 टॉवर आहेत. महसूल विभागाने संबंधित कंपनीच्या थकबाकीदाराना महसूल वसुलीबाबत नोटिस बजावण्यात आली होती. त्यानंतर देखील कंपन्याकडून रक्कम भरली जात नसल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई तहसीलदार महेंन्द्र माळी यांचे मार्गदर्शनाने मंडळ अधिकारी, तलाठी, अर्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आली. अशी माहिती तहसिलदार महेंन्द्र माळी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top