धुळे: शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून मोठ्या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
दिनांक 2 मार्च 2025 रोजी दुपारी 2.20 ते 6.30 या वेळेत फिर्यादी भूषण जीवन माळी (रा. बागुल गल्ली, सोनगीर, धुळे) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 36,000 रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 40/2025 अन्वये BNS कलम 331(3), 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 5 मार्च 2025 रोजी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
इरफान ऊर्फ मुन्ना मोहम्मद हसन अन्सारी (वय 47, रा. चाँदतारा चौक, धुळे)
जाकीर शाह भिकन शाह फकीर (वय 50, रा. मरकज मशिदजवळ, चाँदतारा चौक, धुळे)
पोलिसांनी आरोपींकडून एकूण 72,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये –
30,000 रुपये किंमतीचे सोने (कानातील टॉप्स)
30,000 रुपये किंमतीची यामाहा मोटारसायकल (क्र. MH-18/AQ-8467, गुन्ह्यात वापरलेली)
12,000 रुपये रोख (आरोपी जाकीर शाह फकीर याच्या अंगझडतीतून हस्तगत)
लोखंडी टॉमी (चोरीसाठी वापरण्यात आलेली)
हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वीही एकूण 23 गुन्हे दाखल आहेत. तसेच, न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावल्याने ते पूर्वीही कारागृहात शिक्षा भोगून आलेले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या मोहिमेत सपुनी सचिन कापडणीस, पोउनि रविंद्र बागुल, पोउनि अमित माळी, पोहेकॉ. संदीप पाटील, पंकज खैरमोडे, तुषार सूर्यवंशी, पोकॉ. विनायक खखैरनार, महेंद्र सपकाळ, सुनिल पाटील व मयुर पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
