धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून खाकी वर्दीतील उकृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा आज जागतिक महिलादिनी सन्मान करण्यात आला . जिल्हाभरातील सर्व पोलिसठाण्याअंतगर्त निवडक महिलांचा अधीक्षक धिवरे यांनी आपल्या कार्यालयात बोलवून सन्मान केला. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढावे हा या मागील उद्देश होता.
सन्मानित करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महिलांमध्ये पुढील महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, –
धुळे शहर पोलीस ठाणे – पूनम राजेंद्र मोरे,शहर वाहतूक शाखा – परवीन दिलावर पिंजारी, देवपूर पोलीस ठाणे – दीपाली दत्तात्रेय जाधव, देवपूर पश्चिम पोलीस ठाणे – सुरेख काळू भामरे, आझाद नगर पोलीस ठाणे – वंदना छोटू कासवे , चाळीसगाव रोड पोलीस ठाणे – माधुरी अण्णा , मोहाडी पोलीस ठाणे – वैशाली भानुदास गांगुर्डे , स्थानिक गुन्हे शाखा – शीला श्रीराम सूर्यवंशी , धुळे तालुका – आशा सोमनाथ मासुळे, नरडाणा पोलीस ठाणे – भरती रमेश भोसले , साक्री पोलीस ठाणे – अनिता काळू भदाणे , पिंपळनेर पोलीस ठाणे – मंजुळा राजाराम कोकणे , निजामपूर पोलीस ठाणे – गोदावरी पुंडलिक बागुल , सोनगीर पोलीस ठाणे – रजनी प्रताप पाटील , शिरपूर शहर पोलीस ठाणे – वर्षा विश्वास चौधरी, चित्रा बुधा पवार , शिरपूर तालुका पोलीस ठाणे – नूतन दीपक सोनवणे , रोशनी सखाराम पाटील , थाळनेर पोलीस ठाणे – ललिता रमेश पाटील , दोंडाईचा पोलीस ठाणे – शिल्पा राहुल गुंजेकर , शिंदखेडा पोलीस ठाणे – साक्षी हेमंतसिंग पवार
यांचा आज पोलीस मुख्यालयात पोळवून गौरव करण्यात आला.
