धुळे महानगर पालिकेच्या महासभेत अजेंड्यावरील विषयांसोबतचं इतर विषयांवर चर्चा सुरु होती.. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित केंद्र सरकार ने ‘हर घर झेंडा’ हे अभियान राबवण्याची घोषणा केली आहे.. त्या अनुषंगाने धुळे महानगरातील नागरिकांना घरांवर लावण्यासाठी तिरंगा उपलब्ध करून द्यावा या साठी सर्व नगर सेवकांनी एका महिन्याचे मानधन देऊन त्यातून तिरंगा उपलब्ध करावा अशी सूचना भाजपा नगर सेवकांने मांडली यावर विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेतला. दोन्ही बाजूने चर्चा झडत असतानाच काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक साबीर शेख यांनी काय रामायण लावले असा उल्लेख केला त्यांच्या रामायण या शब्दावर आक्षेप घेत प्रभू रामचंद्रावरून बोलू नका असे म्हणत भाजपा नगर सेवक चांगलेच आक्रमक झालेत. जय श्रीरामच्या घोषनेने सभागृह दणाणले. साबीर शेख यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली अखेर नगरसेवक शेख यांनी माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला…
