धुळ्यात निसर्ग-मित्र समिती तर्फे कर्तबगार महिलांचा ‘राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार’ने सन्मान

महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समितीच्या वतीने राज्यस्तरीय महिला परिषद दिनांक १५ मार्च २०२५ रोजी हॉटेल स्पाईस स्ट्रीट, धुळे येथे पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. शरद पाटील होते. त्यांच्या शुभहस्ते महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले.

या परिषदेच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना ‘राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण निसर्ग-मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, राज्य महासचिव संतोषराव पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पुरस्कारप्राप्त मान्यवर महिला:
सौ. इंदिरा श्रीराम महाजन – अहिराणी गायिका, दोंडाईचा
सौ. अर्चना प्रभाकर पाटील – सरपंच, अंजनविहिरे, ता. शिंदखेडा, जि. धुळे
सौ. मनिषा प्रदीप गहिवरे – उपाध्यक्ष, जायंट्स क्लब ऑफ बालाजी सिटी, शिरपूर
श्रीमती ज्योती सतिष देसाई – पर्यवेक्षिका, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, मालेगाव
श्रीमती भारती दत्तात्रय सोनवणे – मुख्याध्यापिका, न्यू इंग्लिश स्कूल, पाडळदे, ता. मालेगाव
सौ. उज्वला जयाजीराव देशमुख – उद्योजिका, चाळीसगाव
सौ. वंदना दिपक चौधरी – संचालिका, मानसी ब्यूटी पार्लर & अकॅडमी, धुळे
सौ. प्रणिता सुधाकर पडोळे – सरपंच, चिंचाळा, नागपूर
सौ. मंजूषा जीवन गरूड – लोकनियुक्त सरपंच, पिपरखेड, ता. नांदगाव
सौ. ज्योती अनिल धुमाळ – प्रा. शिक्षिका, जि. प. शाळा, पिंपरखेड, ता. नांदगाव
सौ. क्रांती अरुण पाटील – सरपंच, रामनगर रहामपुरे, ता. शिंदखेडा
सौ. ज्योत्सना संतोष लोहार – सामाजिक कार्यकर्त्या, अमळनेर
डॉ. स्वाती किशोर बोरसे – प्राध्यापिका, शि. वि. प्र. संस्थेचे विज्ञान महाविद्यालय, धुळे
सौ. जोशीला अमरचंद पगारिया – भारतीय जैन संघटना, खानदेश उपाध्यक्ष, साक्री
सौ. सुनंदा कैलास पाटील – माजी सरपंच, धनुर लोणकुटे, ता. धुळे
श्रीमती शितल दिलीप पाटील – मुख्याध्यापिका, अस्थिव्यंग दिव्यांग निवासी आश्रम शाळा, नगाव, ता. धुळे
प्रा. डॉ. रूपाली हंसराज पाटील – सहयोगी प्राध्यापिका, SSVPS कॉलेज, धुळे
श्रीमती भारती धोंडू पाटील – कृषी सहाय्यक, तालुका कृषी कार्यालय, जळगाव
सौ. दिपाली राहुल सावंत (ठाकरे) – सहाय्यक प्राध्यापिका, शि. वि. प्र. संस्थेचे विज्ञान महाविद्यालय, धुळे
परविन अजित पिंजारी – सरपंच, ग्रामपंचायत अंतुर्ली खुर्द, ता. पाचोरा
सौ. सुजाता उदय महाजन – उपशिक्षिका, भाऊसाहेब शां. शि. पाटील विद्यामंदिर, चहार्डी, ता. चोपडा
सौ. योजना आत्माराम गांगुर्डे – उपशिक्षिका, स्वा. सै. शिवराव नथ्थू वाणी विद्या मंदिर, पिंपळनेर
श्रीमती कविता जगन्नाथ महाजन – उद्योजिका, पिंपळवाडा-म्हाळसा, चाळीसगाव
सौ. वैशाली भीमराव बिऱ्हाडे – प्रा. शिक्षिका, जि. प. केंद्र शाळा, तामथरे, ता. शिंदखेडा
श्रीमती शशिकला मधुकर पाटील – प्रा. शिक्षिका, जि. प. शाळा, हाडाखेड, ता. शिरपूर, जि. धुळे
सौ. पुनम प्रकाश मालपूरे – धुळे
सौ. पद्ममीनी किरण वाणी – नवसारी

या परिषदेसाठी हॉटेल स्पाईस स्ट्रीटचे संचालक तसेच निसर्ग-मित्र समितीचे राज्य संघटक इंजि. योगीराज मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले. महिला परिषद यशस्वी करण्यासाठी निसर्ग-मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, धुळे जिल्हा अध्यक्ष डी. बी. बापू पाटील, राज्य महासचिव संतोषराव आबा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास आबा देसले, धुळे तालुकाध्यक्ष मनोज पाटील, धुळे शहराध्यक्ष प्राचार्य एच. ए. पाटील, शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर. आर. सोनवणे, साक्री तालुका उपाध्यक्ष संजय बच्छाव, मालेगाव तालुकाध्यक्ष प्राचार्य दीपक देशमुख, जिल्हा महिला जिल्हा संघटक सुरेखा बोरसे, सचिव प्रा. साधना बडगुजर, कार्यालय प्रमुख निसर्ग दादा अहिरे, अक्षय दादा पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राचार्य दीपक देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन धुळे शहराध्यक्ष प्रा. एच. ए. पाटील यांनी केले.

पुरस्कारप्राप्त महिलांना सन्मानपत्र, ट्रॉफी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र, सन्मान वस्त्र व मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले. या परिषदेला निसर्ग-मित्र महिला समितीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top